पुरोहितांचा सल्ला:सर्वपित्री अमावास्याचे राहिलेले श्राद्ध महालय समाप्तीपर्यंत करा

पितृपक्षात पूर्वजांचे श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मात सर्वपितृ विसर्जनी अमावास्या किंवा महालय अत्यंत महत्त्वाची तिथी मानली गेली आहे.

शास्त्राप्रमाणे या दिवशी नियमपूर्वक श्राद्ध केल्याने शेकडो वर्षांपासून अतृप्त आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो. परंतु, प्रत्येक काम एक उचित विधीने केल्याने पुण्य प्राप्त 

होतं. म्हणून श्राद्ध कार्य हेतू काही महत्त्वाचे नियम पालन करून श्राद्ध क्रिया उचित प्रकारे केली जाते. रविवारी (दि.२५) सर्वपित्री अमावास्या 

आहे. या दिवसाचे महत्त्व, समज, गैरसमज याविषयी ज्येष्ठ पुरोहित अनंत भालेराव यांच्याशी साधलेला संवाद सर्वपित्रीला कोणते विधी

करावेत.... या दिवशी सर्व पुण्यात्मांचे मनापासून स्मरण करून त्यांचे आशीर्वाद मागावेत. एखाद्या गोष्टीबद्दल क्षमा मागायची असल्यास त्याची मनापासून कबुली 

द्यावी. आपले पूर्वज मोठ्या अंतःकरणाने आशीर्वाद देतात, अशी भावना आहे. यामुळे पूर्वजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही जगण्याची प्रेरणा मिळते. यासह 

नकारात्मकता संपून जीवन आशादायी होते, असेही सांगितले जाते सर्वपित्री अमावास्येला पिंडदान, तर्पण का करावे? उत्तर : दिवंगत पूर्वजांबद्दल ऋण निर्देशासह 

कोणाची माफी आणि मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा काळ म्हणजे पितृपंधरवडा. त्याचाच समाप्तीचा दिवस म्हणजे सर्वपित्री अमावास्या. पितृ  

तृप्त व्हावेत यासाठी श्राद्ध करून त्यांच्याप्रति आदर व्यक्त करण्याचा हा काळ आहे. त्याला महाकाल श्राद्ध असेही म्हटले जाते. या दिवशी कोणी पिंडदान, तर्पण करावे ?