Daughters Day: मुलीला द्या कन्या दिवसाच्या हटके शुभेच्छा, पहा भारी मेसेज
आज जागतिक कन्या दिवस. जगभरात वेगवेगळ्या तारखांना कन्या दिवस साजरा केला जातो पण भारतात २५ सप्टेंबरला जागतिक कन्या
दिवस साजरा केला जातो. समाजात स्त्रियांना एक विशेष स्थान आणि आदर आहे. त्या वेगवेगळ्या भूमिका निभवत असतात. कधी आई तर कधी
बहिण, कधी पत्नी तर कधी मुलगी. प्रत्येकाचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे. यात विशेष म्हणजे कन्येच एक वेगळं स्थान आहे. याच कन्येच्या प्ति
प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. जर तुम्हाला आपल्या मुलीला कन्या दिवसाच्या काही हटके शुभेच्छा द्यायच्या असेल तर
खालील हटके शुभेच्छांची लिस्ट जाणून घ्या. (Happy Daughters Day) 1. मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे ज्योती मुलगी म्हणजे सौख्याच
औक्षण जागतिक कन्या दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा 2. लक्ष्मीच्या पावलांनी जी घरात येते जिच्या पैंजनांनी सारे घर निनादते जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते
हे सर्व सुख त्याच्याच नशिबी येते ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! . तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला,
माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
4. लेक म्हणजे ईश्वराची देणं,
लेक म्हणजे अमृताचे बोल,
तिच्या पाऊलखुणांनी,
सुख ही होई अनमोल.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा five. छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा You May Like